तब्बल सोळा गावांचा 16 गावांचा मतदानावर बहिष्कार राजकारणी अन प्रशासनाला जोरदार तमाचा

Foto
 
औरंगाबाद कधी राजकारण्यांकडून तर कधी प्रशासनाकडून नागवल्या गेलेल्या जिल्ह्यातील तब्बल सोळा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदानावर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ ! विकासाअभावी त्रस्त ग्रामस्थांना समजवण्यात प्रशासनही अपयशी ठरले.  त्यामुळे उद्या या गावातील मतदार मतदानासाठी बाहेर पडतील का, हा प्रश्न आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील तब्बल सोळा गावांनी बहिष्काराचे अस्त्र उपसणे ही पहिलीच घटना आहे. यात पैठण २, गंगापूर २, वैजापूर १, फुलंब्री १, सिल्लोड १, औरंगाबाद पश्चिम १ या गावांचा समावेश आहे. रस्त्यांसह विविध विकास कामांची मागणी करत या ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार टाकला.  विभागीय आयुक्त तसेच िल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आपल्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर मांडला होता. गेल्या महिनाभरापासून या गावांनी बहिष्काराचा इशारा दिला तरीही ना राजकीय पक्षांनी ना प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वस्त केले.  त्यामुळे अखेरपर्यंत बहिष्काराच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम राहिले आहेत. आता उद्या मतदान होत आहे. अशा परिस्थितीत या सोळा गावांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. लोकशाही प्रणाली आपल्या अधिकारांचा वापर करण्याची मुभा प्रत्येकाला आहे. मात्र विकासकामांसाठी  नागरिक थेट मतदानावर बहिष्कार घालत असतील तर राजकीय नेत्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे म्हणावे लागेल. या गावांना आतापर्यंत रस्ताही मिळू नये यासारखी शोध शोकांतिका दुसरी नाही हेच खरे